Breaking News

विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत हे छावाचे कार्य कौतुकास्पद

 । मोटार वाहन निरिक्षक योगिता मगर यांचे प्रतिपादन

अहमदनगर, दि. 24 - नगर जिल्ह्यात अखिल भारतीय छावा संघटना हि सर्व सामान्यांवर अन्याय होताना तत्परतेने जागरुकपणे त्यांना न्याय देणयाचा प्रयत्न करते या संघटनेचे सामाजिक क्षेत्रातही  मोठे योगदान आहे. गोर-गरीब वंचीत घटकांना छावा तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करुन जी मदत केली ती कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन मोटार वाहन निरिक्षक योगिता मगर यांनी केले. 
नगर येथील छावा संघटनेच्या वतीने महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा सांगळे यांनी संम्बोधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून योगिता मगर  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. प्रारंभी छावाचे संस्थापक अध्यक्ष कै. शिवाजीराजे सांगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी  जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण, शहराध्यक्ष दत्ता वामन,इंजिनिअर डि.ई भगत, शंकर आडोळे, सातिष शिंदे,  दिलीप गायकवाड, जितु शिंदे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना मगर पुढे म्हणाल्या कि,  विद्यार्थ्यानी वाहगुकीचे नियम पाळावेत, स्वत:चे वय पुर्ण झाल्याशिवाय वाहने चालवुन  नये. 18 वर्ष पुर्ण झाल्यावरच गाडी चालवावी. गाडी चालवितांना मोबाइलचा वापर टाळावा. तीन ते चार सीट घेवुन गाडीवर जाऊ नये. असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. छावा च्या या उपक्रमाचे कौतुक करुन कै.शिवाजीराजे यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी सुरेखा सांगळे सक्षमपणे उभ्या राहिल्यात हि अभिमानास्पद गोष्ट आहे.
यावेळी संम्बोधी चे प्राचार्य बी.बी.बांगर यांनी प्रास्तविकात छावा संघटनेच्या वतीने दरवर्षी  आमच्या विद्यालयातील गोर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात त्यांच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणा मिळते असे सांगितले.  या कार्यक्रमास रविंद्र पटेकर, श्रीकांत पाखरे, अशोक साळी, जयंत गायकवाड, अजय भिंगारदिवे, संजय ठोंबरे, अशोक औशीकर, आदिंसह छावा संघटनेचे सदस्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.