Breaking News

आत्मघातकी हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, दि. 30 -  अफगाणिस्तानमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांकडून लष्करी ताफ्यावर करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जण मृत्यूमुखी पडले आहेत. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलपासून काही अंतरावर हा प्रकार घडला. यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसला आत्मघाती स्फोटाने लक्ष्य केले. ही बस वर्दक प्रांतातून पोलिसांना घेऊन काबु
ल येथे निघाली होती.