Breaking News

हाफिज सईदने ड्रोन हल्ल्याच्या भीतीने ओकली गरळ

इस्लामाबाद, दि. 11 - पाकसह तेथील दहशतवादीही भारत आणि अमेरिकेतील वाढत्या संबंधाने चांगलेच खवळल्याचे दिसत असून शुक्रवारी तेथील सैन्याला मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंड तथा जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने पाक हद्दीत येणार्‍या अमेरिकेच्या ड्रोनला उडवण्याचे आवाहन केले आहे. त्याने लाखो लोकांपुढे केलेल्या भाषणात भारतासह अमेरिकेवरही चांगलीच गरळ ओकली.
पाच देशाचा दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची बेट घेतली होती. त्यानंतर अमेरिकेने दहशतवादी कारवाईसाठी भारताला संपुर्ण मदत देण्याचे आश्‍वासन दिल्याने पाकसह दहशतवादी खवळले आहेत. 21 मेला पाकच्या बलुचिस्तान प्रांतात अमेरिकेने ड्रोन हल्ला करत तालिबानी नेता मुल्ला अख्तरचा खातमा केला होता. त्यामुळे अमेरिका पाकमध्ये आणखी ड्रोन हल्ले करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हाफिज सईदची भीतीने गाळण उडाली आहे. सिमेपलीकडून येणारे प्रत्येक ड्रोन उडवण्याचे त्याने पाक लष्कराला आवाबन केले आहे. यासह त्याने भारत आणि अमेरिकेविरोधात गरळ ओकली आहे.