चीनची पाकिस्तानवर आणखी कृपादृष्टी
इस्लामाबाद, दि. 11 - चीन 8.5 अब्ज अमेरिकी डॉलर्सची (जवळपास 57 अब्ज रुपये) गुंतवणूक पाकिस्तानच्या रेल्वे नेटवर्कला अधिक चांगले बनविणे आणि पाकिस्तान-इराणदरम्यान एका गॅस पाईप लाईनची निर्मिती करण्यासाठी करणार आहे. पाकिस्तानच्या मोठ्या प्रकल्पांना अधिकृत करणा-या केंद्रीय विकास कार्य विभागाने 10 अब्ज अमेरिकी डॉलर्स खर्चाच्या दोन प्रकल्पांना मान्यता दिली होती.
चीन या दोन्ही प्रकल्पांसाठी 85 टक्के (8.5 अब्ज अमेरिकी डॉलर्स) कर्ज देणार आहे. ‘दी एक्स्प्रेस ट्रिब्युन’ च्या अहवालानुसार पाकिस्तानचे रेल्वे नेटवर्क विकसित करण्यासाठी एकूण 8.2 अब्ज डॉलर्सचा खर्च येणार आहे. ज्यातील 7 अब्ज डॉलर्स चीनकडून सवलतीच्या दरातील कर्ज म्हणून दिले जाणार आहे. हा प्रकल्प 46 अब्ज डॉलर्सच्या चीन-पाक आर्थिक पट्ट्याचा एक हिस्सा आहे. या करारावर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पाकिस्तान दौ-यात एप्रिल 2015 मध्ये स्वाक्षरी केली होती तर ग्वादार-नवाबशाह एलएनजी टर्मिनल पाईप लाईन प्रकल्पाचा अनुमानित खर्च 2 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. ज्यात 1.4 अब्ज डॉलर्सचे कर्ज चीनद्वारे दिले जात आहे.
हा प्रकल्प पाकसाठी रणनीतिक रूपाने खूपच महत्त्वाचा आहे. यामुळे पाकिस्तानचे गॅस नेटवर्क थेट इराणच्या यंत्रणेशी जोडले जाईल. सध्या पाकिस्तान रेल्वे देशाच्या 4 टक्क्यांपेक्षाही कमी लोकांचा प्रवास घडविते. पाकिस्तान हे 2025 पर्यंत हे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत पोहोचवू इच्छितो. हा प्रकल्प 2021 पर्यंत दोन टप्प्यांत पूर्ण करण्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यात इंजिनीअरिंग, प्रोक्युमेंट आणि कन्स्ट्रक्शनचे (ईपीसी) काम पूर्ण केले जाईल. पहिला टप्पा डिसेंबर 2017 पर्यत पूर्ण करण्याची योजना आहे. तर दुसरा टप्पा 2021 पर्यत पूर्ण होईल.