झिम्बाब्वेचे टीम इंडियाला 169 धावांचे आव्हान
हरारे, दि. 11 - झिंम्बाब्वेविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 49.5 ओव्हरमध्ये सर्वबाद 168 धावा काढल्या, तर जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने 4 गडी बाद केले त्याचबरोबर धवल कुलकर्णी आणि बरिंदर सरनने दोन-दोन गडी बाद केले, तर अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल यांनी एक-एक गडी बाद केला. झिम्बाब्वेकडून चिगुंबराने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली.
दरम्यान झिम्बाब्वेला बरिंदर सरनने पहिला धक्का दिला. त्याने पीटर मूरला 3 धावांवर असताना पायचीत केले. दुसरीकडे धवल कुलकर्णीने हॅमिल्टन मास्कद्जाला धोनीच्या हातून झेलबाद केले. त्याने 21 चेंडूत 14 धावा काढल्या. चामू चिभाभाला जसप्रीत बुमराहने 13 धावांवर त्रिफळाचीत केले. यूसी सिबांडाला बुमराहने धोनीच्या हातून झेलबाद केले. त्याने 21 चेंडूत5 धावा काढल्या. क्रेग इर्विन (21) च्या रुपात झिम्बाब्वेला पाचवा झटका बसला. अक्षर पटेलने त्याला बाद केले. सिकंदर रजा 23 धावा काढून सरनच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.