इस्तांबूल बॉम्ब स्फोट; 7 पोलिसांसह 11 ठार
अंकारा, दि. 07 - दहशतवाद्यांनी इस्तांबूलमधील बेयाजित जिल्ह्यात पोलिसांच्या शटल बसला टार्गेट केले. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास व्हेजनेसिलर मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 7 पोलिसांसह 11 जण ठार झाले. पोलिसांच्या बससह काही वाहने चक्काचूर झाली आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटात 36 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. इस्तांबूल यूनिव्हर्सिटीपासून हे ठिकाण जवळच असून प्रमुख टूरिस्ट पॉईंट मानला जातो. बॉम्बस्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पोलिस अधिकार्यांचा समा
वेश आहे. स्फोट घडवून आल्यानंतर फायरिंग झाल्याचेही वृत्त आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हा बॉम्बस्फोट रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने घडवण्यात आला. अद्याप कोणीही या स्फोटाची जबाबदारी स्विकारली नाही. बॉम्बस्फोटात कुर्दिश दहशतवादी अथवा इसिसचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुर्किस्तानचे अध्यक्ष तैय्यप एर्गोदेन यांनी सांगितले की, हा भ्याड हल्ला असून सिक्युरिटी फोर्सेचा सामना करू न शकणार्या दहशतवाद्यांनी हा ब्लास्ट घडवून आणला आहे.