Breaking News

‘ध्वनी प्रदुषण’ कारवाईसाठी 37 पोलिस अधिकार्‍यांची नियुक्ती

। उच्च न्यायालयाचा आदेश । कडक निर्बंधामुळे सीडी व डिजे हद्दपार होणार । 

 अहमदनगर । प्रतिनिधी । 09 - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणावर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने  37 पोलिस अधिकार्‍यांची निवड केली आहे. सी. डी. व डी. जे. च्या कर्कश आवाजावर यापुढे पोलिसांची करडी नजर राहणार असून, कर्कश आवाजाला लगाम बसणार आहे. केवळ नागरिकांची साधी तक्रार आल्या
स तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याने यापुढे सी. डी. व डी. जे. हद्दपारीच्या मार्गावर आहे. लग्न समारंभ, वरात, उद्घाटने, मिरवणुका, यासाठी सी. डी. व डी. जे. च्या कर्कश आवाजाने मोठे ध्वनी प्रदूषण होत असल्याने यासाठी उच्च न्यायालयाने काही निकष जारी केले आहेत. त्यानुसार आता ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण येणार आहे. 
 जिल्ह्यात पोलिस प्रशासनातर्फे 37 पालिस अधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे व तसे अधिकार पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. नागरिकांची तक्रार आल्यास थेट कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात पोलिस अधिकार्‍यांसह उपअधीक्षक व पोलिस ठाण्यांच्या प्रभारींना कारवाईचे थेट अधिकार देण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकार्‍यांचे नाव जाहीर करून नागरिकांसाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक , इमेल आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषण अधिकार्‍यांमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी , नगर शहर विभाग बजरंग बनसोडे, नगर ग्रामीण  आनंद भोईटे, कर्जत विजय लगारे, शेवगाव - आनंद भोईटे (अतिरिक्त), श्रीरामपूर  विवेक पाटील (अतिरिक्त), शिर्डी  विवेक पाटील, संगमनेर अजय देवरे, कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. नि. मालकर, तोफखान्याचे सपोनि. राहुल गायकवाड, भिंगार कॅम्पचे सपोनि विनोद चव्हाण, नगर तालुक्याचे परिविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक विशाल आनंद, एमआयडीसीचे सपोनि. राहुल पवार, पारनेरचे पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर, सुप्याचे पोनि शाम सोमवंशी, कर्जतचे सपोनि अजित चिंतले, जामखेड पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र इंगळे, श्रीगोंद्याचे पोनि. साहेबराव कडनोर, बेलवंडीचे सपोनि. सचिन वांगडे, पाथर्डीचे पोनि. वसंत भोये, शेवगाव पोनि. सुरेश सपकाळे, नेवासा पोनि. संपत शिंदे, सोनई सपोनि. सचिन सानप, श्रीरामपूर शहर पोनि. दिलीप पवार, श्रीरामपूर तालुका सपोनि. किशोर परदेशी, राहुरी पोनि. प्रमोद वाघ, कोपरगाव पोनि. सुरेश शिंदे, कोपरगाव ग्रामीणचे पोनि. शहाजी नरसोडे, शिर्डीचे पोनि. प्रताप इंगळे, राहाता पोनि. सुरेश बेंद्रे, लोणी सपोनि. नितीन पगार, संगमनेर शहर पोनि. गोकुळ औताडे, संगमनेर तालुका पोनि. गोविंद ओमासे, घारगाव पोनि. दिलीप निघोट, अकोले पोनि. नारायण वाफारे, राज़ूरचे सपोनि. भरत जाधव, आश्‍वीचे सपोनि. राहुल पाटील आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी नियंत्रण कक्षाचे पोनि. राजेंद्र पडवळ यांचा समावेश आहे.