Breaking News

28 जूनला हाजी अली दर्गा प्रवेशाचा निर्णय !

मुंबई, दि. 10 -  मुंबई उच्च न्यायालय 28 जून रोजी मुंबईतील हाजीअली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देण्याबाबत निर्णय सुनावणार असून मुस्लिम महिलांना मक्का, मदिना, नजफ आदी धार्मिक स्थळांवर प्रवेश आहे, मात्र हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश बंदी आहे. हाजी अलीमध्ये 2011पर्यंत महिलांना प्रवेश दिला जात होता, मात्र दर्ग्याचे विश्‍वस्त बदलल्यानंतर महिलांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. ‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ अर्थात बीएमएमएने या दर्गाबंदीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज निर्णय अपेक्षित होता. मात्र हा निर्णय आता 28 जूनला सुनावण्यात येणार आहे.