23 जूननंतर समीर गायकवाडवर आरोप निश्चिती
मुंबई, दि. 11 - 23 जूनपर्यंत कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाला अटकेत असलेला आरोपी समीर गायकवाडवर आरोप निश्चित करु नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
आज कोल्हापूर सत्र न्यायालयात गोविंद पानसरे हत्या प्रकरणी समीर गायकवाडवर आरोप निश्चिती केली जाणार होती. मात्र, पानसरे हल्ल्यात वापरलेल्या शस्त्राबाबत स्कॉटलंड यार्डचा बॅलास्टिक अहवाल अजून यायचा आहे. तो अहवाल येईपर्यंत समीर गायकवाड विरोधात आरोप निश्चित करु नयेत अशी मागणी सरकारी पक्षाने कोल्हापूर सत्र न्यायालयाकडे केली होती. मात्र कोल्हापूर सत्र न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली. त्या विरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाची मागणी अंशत: मान्य केल्यामुळे कोल्हापूर सत्र न्यायालयात समीर गायकवाडवर होणारी आरोप निश्चिती आता पुढे ढकलली गेली आहे.