Breaking News

2015 साली रस्ते अपघातात 1.46 लाख लोकांनी गमवला जीव

नवी दिल्ली, दि. 11 -  देशात दररोज रस्त्यावरील अपघातांच्या 341 घटना घडत असून 2015या एकाच वर्षात देशात रस्त्यावरील अपघातामुळे 1लाख 46 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
गुरूवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या अहवालातून रस्त्यावरील अपघातांबाबतची आकडेवारी समोर आली असून 2014च्या तुलनेत 2015मध्ये रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत 2.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2015मध्ये एकूण 5 लाख 1 हजार अपघातांची नोंद झाली आहे. म्हणजे सरासरी देशात दररोज 341 अपघात होत असून त्यामध्ये दररोज 400 जणांचे बळी जात आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना गडकरी यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर होणारे अपघात हे चांगले लक्षण नसून युद्धातदेखील एवढी माणसे मरत नाही, असे म्हटले आहे.