नक्षलवाद्यांचा छत्तीसगडमध्ये आयटीबीपी कॅम्पवर हल्ला
रायपूर, दि. 09 - आज पहाटे नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात इंडो तिबेटीयन सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) कॅम्पवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
याबाबत अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी आयटीबीपीच्या 41 व्या बटालियनवर रॉकेट व बंदुकीच्या सहाय्याने हल्ला केला. कोंडागाव जिल्ह्यातील राणापाल भागात हा हल्ला झाला असून, सुमारे 100 नक्षलवाद्यांनी तिन्ही बाजूने कॅम्पला घेरून हल्ला केला. मध्यरात्री साडेबारापासून पहाटे तीनपर्यंत गोळीबार सुरु होती. नक्षलवाद्यांनी कॅम्पच्या दिशेन चार रॉकेटही डागले. आयटीबीपीच्या जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने सुमारे 600 राऊंड फायर झाले आहेत. या हल्ल्यानंतर नक्षलवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले.