Breaking News

स्टेट बँक व्यवस्थापकास शेतकर्‍यांसह काँग्रेसचा घेराव

चिखली, दि. 3 - चिखली तालुक्यातील शेतकर्‍यांना भारतीय स्टेट बँकेच्या जाचक अटीमुळे कर्जासाठी नाहकपणे वेठीस धरल्या जात असतांना, ही माहिती मिळताच तालुका कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, बाजार समितीचे सभापती विष्णु पाटील, बाजार समितीचे संचालक सचिन शिंगणे, शेतकरी संस्था संचालक शिवनारायण म्हस्के, यांनी आपल्या कार्यकर्त्यांना व शेतकर्‍यांना सोबत घेवून स्टेट बँकेेचे कार्यालय गाठले. व्यवस्थापक श्री बावने गैरहजर असल्याने शाखेचे कृषी व्यवस्थापक श्री चागडे व त्यांचे प्रतिनिधी यांना धारेवर धरत शेतकर्‍यांना होत असलेल्या त्रासाबध्दल व जाचक अटी आणी नियमावली बध्दल विचारणा करून शेतकर्‍यांचे पुनर्गठण कर्जाबध्दल थेट नरमाईचे धोरण बॅक अधिकार्‍यांनी घ्यावे. व शेतकर्‍यांना त्वरीत कर्ज उपलब्ध करून दयावे, व त्यांच्या मानसूनपूर्व हंगामाच्या आर्थीक अडचणी सोडवून त्यांना मदत करावी. अन्यथा आंदोलनाचा ईशारा देत सर्व कार्यकर्ते व शेतकरी बँकेत ठिय्या मांडुन बसले होते, परंतु शाखेच्या कृषी व्यवस्थापकांनी नरमाईचे धोरण घेत शेतकर्‍यांना त्रास न होण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे आंदोलन तात्परत्या स्वरूपात मागे घेण्यात आले.
यावेळी उत्रादा, शेलुद, भोरसा भोरसी, भालगांव, बेराळा, इत्यादी गावाचे शेतकरी उपस्थित होते. तसेच बाजार समितीचे संचालक ईश्‍वर इंगळे, ज्ञानेश्‍वर सुरूशे, विजय शेजोळ, भारत म्हस्के, सुनिल पवार, सिध्देश्‍वर इंगळे, शेनफड सोळंकी, गणेश परीहार, आनंथा परीहार, अंकुश सोळंकी, निवृत्ती इंगळे इत्यादी पदाधिकारी व शेतकरी मोठया संख्येने हजर होते.