महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परिक्षेत यापुढे नापास शिक्का नाही
मुंबई, दि. 31 - यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवर नापास हा शिक्का असणार नाही तर त्याऐवजी प्रमोटेड टू स्कील डेव्हलपमेंट असे लिहिले जाईल असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. या मुळे विद्यार्थ्यांचे परिक्षेचे टेन्शन कमी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तावडे म्हणाले, यंदाच्या सत्रापासूनच या निर्णयाची अम्मलबजावणी केली जाईल. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर पास फॉर इलेव्हन असा शिक्का येईल. देशातील असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे बहुदा पहिलेच राज्य असावे असेही ते म्हणाले. तावडे म्हणाले बोर्डाच्या दहावी परिक्षेचा निकाल 96 टक्कयांपर्यंत असतो म्हणजे नापासांची संख्या चार टक्के असते. नापास झालेल्या मुलांना वाईट सवयी लागण्याचा तसेच ती गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका मोठा असतो. त्यामुळे अशा मुलांना दोन वर्षाचा ट्रेनिंग डिप्लोमा करण्यास प्रवृत्त केले जाई. याची त्यांना रोजगार मिळण्यास मदत होईल. अर्थात त्यासाठी प्रत्येकाचे समुपदेशन करून त्यांच्या आवडी लक्षात घेतल्या जाणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.