राज्यसभा व विधान परिषद भाजपने दिली मित्र पक्षांना संधी
मुंबई, दि. 31 - महाराष्ट्रातील राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारांची नावे अखेर भाजपने जाहीर केली असून विनय सहस्त्रबुद्धे यांच्या बरोबरच नागपूरच्या डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देऊन भाजपने सर्वांनाच धक्का दिला. मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यासह मनसेमधून आलेल्या प्रवीण दरेकर यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देत भाजपने पक्षातील इच्छुकांना धक्का दिला. भाजपने एक जागा रिपाइंसाठी अजून राखून ठेवली असून रामदास आठवले यांनी केंद्रातील मंत्रिपदाचा आग्रह सोडला तर त्यांना ही जागा दिली जाणार आहे.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत असून विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या 5 जागा निवडून येऊ शकतात. मित्र पक्षांना 3 जागा सोडून भाजप 2 जागा लढवेल, असा अंदाज होताच त्यामुळे उर्वरित 2 जागांसाठी तब्बल डझनभर इच्छुक स्पर्धेत होते. मराठवाड्यातील सुजितसिंह ठाकूर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर आज विनायक मेटे व सदाभाऊ खोत यांच्या बरोबरच पक्षाचे उमेदवार म्हणून प्रवीण दरेकर यांना उमेदवारी देऊन भाजपने आणखी एक धक्का दिला.
मुंबईतून पक्षाचे महापालिकेतील नेते मनोज कोटक तसेच पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह रघुनाथ कुलकर्णी, शायना एनसी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, भाजपने या सर्वांना डावलून मनसेतून आलेल्या प्रवीण दरेकर यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिला. पुढील वर्षी होणा-या मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली; पण यामुळे पक्षातील इच्छुक मात्र नाराज झाले आहेत. निष्ठावंतांना डावलून ‘उप-या’ ना बक्षिसी देण्याच्या धोरणामुळे इच्छुक धुसफुसत आहेत. रिपाइं नेते रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद हवे आहे. ते मिळणार नसेल तर काहीच नको, अशी ठाम भूमिका आठवले यांनी घेतली आहे. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे एका जागेवर अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. ती जागा आपल्याल्या मिळू शकते, अशी आशा असल्याने इच्छुक मंडळी अजून गप्प आहेत.