सरकारला दुष्काळासंदर्भात गांभीर्य नाही ः वळसे पाटील
। मराठवाड्या इतकाच गंभीर दुष्काळ जिल्हयात ः वळसे पाटील
अहमदनगर, दि. 30 - एवढाच नगर जिल्हातील दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे पण सरकारला दुष्काळाचा विचार करणेस वेळ नाही. उदयोगपतींना सरकार कोटयावधीची मदत करते. पण शेतक-यांची कर्ज माफीची त्यांची मानसिकता नाही. दुष्काळी स्थितीकडे दुर्लक्ष करणा-या सरकारला विधानसभेत जाब विचारनार आहे. दुष्काळी स्थितीवर मात करणेसाठी दुष्काळी परिषद मा.अध्यक्ष विधानसभा मा.श्री.दिलीपरावजी वळसे पाटील यांचे उपस्थितीत तर माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते मा.श्री.मधुकररावजी पिचड साहेब यांचे अध्यक्षतेखाली श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बु. येथे सोमवार दि. 30/05/2016 रोजी दुपारी 2.00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी प्रसिध्दीस दिलेले पत्रकात म्हटले.सरकार दुष्काळाबाबत गांर्भियाने का घेत नाहीत. हेच कळणेस मार्ग नाही. त्यावर उपाययोजनासाठी किचकट अटी सरकारने घातलेल्या आहेत. दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. हे सरकारचे अपयश आहे. विरोधी पक्षा आमदार असल्याने विविध प्रकारच्या अडचणींना तोंड दयावे लागत आहे. आमदार राहुल जगताप यांनी कुकडी कारखान्यामार्फत 27 चारा छावण्यांचे प्रस्ताव दाखल केले परंतु फक्त 1 छावणीस श्रीगोंदा तालुक्यात मंजूरी देण्यात आली. नगर येथील राळेगण म्हसोबा येथे अशा 2 छावण्यांना मंजूरी देण्यात आली आहे. पंरतु दुष्काळी परिस्थितीचा सामना करणेसाठी आमदार राहुल जगताप यांनी कुकडी पॅटर्नअंतर्गत जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. सध्या बेलवंडी, लोणी, पिंपळगांव पिसा, बाबुर्डी इ. गावांमध्ये जलयुक्ताची कामे सुरू आहे. संपूर्ण विधानसभा मतदार संघामध्ये ह ेजलयुक्त शिवार अभियान आमदार राहुल जगताप हे राबविणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या सरकारच्या वेळी शेतकरी आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा. अशी मागणी करत होते. आता तर आत्महत्या कमी होणेऐवजी वाढत आहेत.
आम्ही खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार नाही. पण त्यांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर येवून शेतक-यांविषयी सहानुभुती पुर्वक विचार करावा असे हरिदास शिर्के यांनी सांगितले.
आज उदयोगपती अडचणीत आहेत. म्हणून त्यांना सवलतीची खैरात दिली जात आहे. आज शेतकरी राजाही अडचणीत असताना त्यांना मदत करणे. हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवत आज सरकार सत्तेवर आले. त्याचा सरकारला विसर पडला आहे. जाहिरातीवर करोडो खर्च करणा-या सरकारने शेतक-यांविषयी सहानुभूतीपुर्वक विचार करावा आणि सरकारला जाग आणण्यासाठी या दुष्काळ परिस्थितीतीचे आयोजन करण्यात आले असे हरिदास शिर्के यांनी सांगितले. या दुष्काळ परिषदेसाठी सर्व राष्ट्रवादी कॉग्रेसचे, कॉग्रेसचे पदाधिकारी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, कुकडी कारखाना संचालक, स.म.शि.ना.ना.कारखाना संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि श्रीगोंदा नगर परिषदेचे नगरसेवक यांनी उपस्थितीत रहावे. असे अवाहन हरिदास शिर्के यांनी केले.