जबाबदारी घ्यायला आवडते- अजिंक्य रहाणे
मुंबई, दि. 31 - वेस्ट इंडिज दौर्यासाठी भारतीय क्रिकेट टीमच्या उपकप्तानपदाची जबाबदारी दिलेल्या क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने त्याला जबाबदारी घ्यायला आवडते असे सांगितले आहे. रहाणे म्हणाला ही जबाबदारी दिल्याने चांगले वाटते आहेच पण त्यामुळे माझा खेळ सुधारण्यासही मदत मिळणार आहे. 3-4 वर्षापूर्वी त्याने भारत ए टीमबरोबर वेस्ट इंडिज दौरा केला होता. तेथील विकेट त्यावेळी संथ होती पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी विकेट नक्कीच वेगळी असेल. ही विकेट स्पीनरला साथ देईल असा आत्ताचा अंदाज आहे मात्र प्रत्यक्षात विकेटची पाहणी केल्यानंतरच त्याबाबतचा अंदाज येऊ शकणार आहे.
हा दौरा रोमांचक होईल असा विश्वास व्यक्त करून रहाणे म्हणाला, आम्ही युवा टेस्ट टीम घेऊन जातोय. आमचा खेळ चांगला होतोय त्यामुळे उत्साह वाटतोय. उपकप्तानपदाची जबाबदारी आहे पण झिबाबे दौर्यावर मी कप्तान म्हणून गेलो होतो व तेव्हा माझ्या सहकारी खेळाडूंकडून मी खूप शिकलो. त्यामुळे हा अनुभवही नवीन कांहीतरी शिकविणारा असेल असे वाटते.