‘सहारा’ विकणार 4700 एकर जमीन
नवी दिल्ली, दि. 31 - स्वतःच्या मालकीची 4700 एकर जमीन लिलाव पद्धतीने जास्तीत जास्त किंमतीला विकण्याचा निर्णय सहारा इंडिया समूहाने घेतला असून यातून आलेल्या रकमेतून ते चीट फंडासाठी गुंतवणूकदारांकडून घेतलेले कोट्यवधी रुपये परत करणार आहेत. एचडीएफसी रिअॅल्टी आणि एसबीआय कॅपिटल मार्केट सहारा समूहाच्या 60 संपत्तींचा लिलाव करण्याची प्रक्रिया पार पाडत आहे.
सहारा समूह देशातील एकूण 14 राज्यांमध्ये पसरलेल्या विविध भूखंडांची विक्री करणार आहे. सहाराने हे सर्व भूखंड मिळून एकूण 4,700 एकर जमीन होते, ती जमीन विकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सहारा समूहाने सांगितले आहे की, 33,633 एकर जमीन आमच्याकडे आहे. यातील आम्ही 4,700 एकर जमीन विकत आहोत. यात लोणावळ्याच्या एम्बी व्हॅली परिसरातील 10,600 एकर आणि उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांमध्ये असलेल्या 1 हजार एकर भूखंडांचीही विक्री करणार आहोत. देशात पहिल्यांदाच एखादा ग्रुप इतक्या मोठ्या प्रमाणात जमीनची विक्री करीत आहे. या जमीन विक्रीतून सहाराला 6 हजार 500 कोटी रुपये प्राप्त होतील.