देशभरातील 5 कोटी नागरिकांकडे बनावट वाहन परवाने
नवी दिल्ली, दि. 29 - देशातील प्रत्येक तिसर्या व्यक्तीचा वाहन परवाना बनावट असण्याची शक्यता असून कारण याबाबतीत मिळालेल्या आकडीवारीनुसार जे लोग रस्त्यावर वाहन चालवतात त्यांच्यापैकी 5 कोटी लांकाचे वाहन परवाने बनावट आहेत. जर का कोणी बनावट परवान्यासह गाडी चालवताना सापडल्यास त्या चालकास एक वर्ष कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा नवीन कायदा करण्यात आला आहे. सध्याच्या नियमानुसार बनावट परवान्यानुसार गाडी चालवणार्यास 3 महिन्याचा कारावास आणि 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
एखादा वाहन चालक 18 वर्षाखालील असल्यास तर त्याच्या पालकास 3 वर्षाचा कारावास आणि 20,000 रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे त्याच्या गाडीचे रजिस्ट्रेशनही रद्द करण्यात येणार आहे. देशभरात वाहन चालविण्याचे सुमारे 30 टक्के परवाने चुकीच्या पद्धतीने दिले गेले असून, ते बनावट आहेत. परवाना पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासह अपघातांना प्रतिबंध करण्याकरीचा केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.