Breaking News

पीएफ खातेदारांच्या व्याजदरात कपात

नवी दिल्ली, दि. 26 -  भविष्य निर्वाह निधीचे खाते असणार्‍यांसाठी, अर्थमंत्री अरूण जेटली यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता पीएफ खातेधारकांच्या डिपॉझिटवर 8.7 टक्के व्याजदर दिला जाणार आहे. 31 मार्च 2015 रोजी संपलेल्या 2015-16 या आर्थिक वर्षात पीएफ खाते धारकांना 8.7 टक्के एवढा व्याजदर मिळणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी माहिती दिली
हा व्याजदर 2015-16 पासून लागू होणार आहे. त्यावर आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संमती दिली आहे. ईपीएफचा 2015-16 या आर्थिक वर्षाचा व्याजदर निश्‍चित करण्यात आला आहे. यापूर्वी पीएफवरील व्याजदर 8.75 टक्के होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे देशभरात जवळपास 4 कोटी सभासद असल्याचे सांगितले जाते.