ऑनलाईन ग्राहकांच्या तक्रारींसाठी समिती - पासवान
नवी दिल्ली, दि. 20 - एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी करणार्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विविध मार्ग सुचविण्यासाठी सरकार लवकरच समिती स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी दिली.
ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीनंतर पासवान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘एफएसएसएआय‘, स्वयंसेवी संस्था, ग्राहक कल्याण मंत्रालयाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. यावेळी पासवान म्हणाले, की पेयजलाची शुद्धता हा चिंतेचा विषय आहे. त्याच्या शुद्धतेचे निकष एफएसएसएआय‘ने ठरविले आहेत आणि शुद्ध पाण्याची जबाबदारी महापालिका, स्थानिक प्रशासनाची आहे. या सार्या पार्श्वभूमीवर स्रोत शुद्धतेच्या निकषांचे पालन करण्याचे व तसे न झाल्यास कारवाईचे अधिकार एफएसएसएआय‘कडे सोपवावेत, असे परिषदेने सुचविले. परंतु असे अधिकार सोपविल्यास पालिका, महापालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था एफएसएआय‘ला उत्तर देण्यास बाध्य असतील काय, या प्रश्नावर सरकारमध्ये मात्र एकवाक्यता नाही. फसव्या, अतिशयोक्तीपूर्ण जाहिरातींबाबत उत्पादकांबरोबरच जाहिरात करणार्या सेलिब्रिटींना अभिनेते, नायिका, खेळाडू, नामवंत कलाकार जबाबदार मानावे, अशी शिफारस असल्याचे पासवान यांनी सांगितले. मात्र या सेलिब्रिटींवर काय कारवाई होणार यावर थेट उत्तर देण्याचे टाळून त्यांनी, जाहिरात करण्याआधी सेलिब्रिटींनीच उत्पादनाची सखोल माहिती घ्यावी, अशी टिप्पणी केली.