Breaking News

रेल्वे गाड्यांच्या प्रकल्पावर ’ड्रोन’ची नजर

नवी दिल्ली, दि. 19 - आता रेल्वे गाड्यांच्या मोठ्या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी, त्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार असून, यासंबंधीचा पथदर्शी  प्रयोग भारतीय रेल्वे प्रशासनाने नुकताच राबविला. ड्रोन प्रकल्पाचा
उपयोग भारतीय रेल्वेच्या कामे सुरू असलेल्या इतर योजनांवरही लक्ष ठेवण्यासाठी होणार आहे.
यामध्ये वापरण्यात येत असलेल्या मानवरहित हवाई वाहन तथा ड्रोनचा वापर डेडिकेटेड फ्राइट कॉरिडॉर योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी  करण्यात आला. आता रेल्वेच्या इतर सुरू असलेल्या कामांवर या ड्रोनचा वापर करण्याची सरकारची योजना आहे.
त्याचप्रमाणे रेल्वे दुर्घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देखील या ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. या ड्रोनमार्फत चालू कामाचे ‘लाइव्ह रेकॉर्डिंग‘ केले जाणार  आहे.
आम्ही या ड्रोनचा वापर राजस्थानच्या बगहेगा ते श्रीमाधोपुरच्या दरम्यान 42 किलोमीटर लांब आणि बिहारमधील दुर्गावतीपासून सासाराम दरम्यान 56 किलोमीटर लंबी  रेल्वेच्या पटरीचे निरीक्षण करण्यासाठी केला आहे, असे रेल्वे अधिकारी आदेश शर्मा यांनी सांगितले.