अमिताभ यांना अतुल्य भारत’चे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करण्यास स्थगिती
नवी दिल्ली, दि. 19 - पनामा पेपर लीक प्रकरण बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांना चांगलंच भोवलं आहे. अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याच्या निर्णयाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने स्थगिती दिली आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, जोपर्यंत अमिताभ यांना क्लीन चिट मिळत नाही, तोपर्यंत त्यांची अँबेसेडर म्हणून नियुक्ती करता येणार नसल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं सांगितलं आहे.
सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात अमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अँबेसेडर बनवण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र आता हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. पनामा पेपर लीक झाल्यानं जगभरात खळबळ उडाली होती. भारतातून अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन यांची नावं समोर आली होती. मोदी सरकारनं पनामा पेपर लिकमध्ये बच्चन यांचं नाव आल्यानं आता सावध पवित्रा घेतला आहे. आता फक्त प्रियंका चोप्रा अतुल्य भारतची ब्रँड अँबेसेडर असणार आहे.
पनामा पेपर लिकमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांची नावं असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. केंद्रीय मंत्रालयानं याप्रकरणी समिती नेमली आहे. अमिताभ बच्चन निर्दोष आढळल्यास त्यांच्या नावाचा पुनर्विचार केला जाईल, असंही केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे.