Breaking News

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षयकडून 50 लाखांची मदत

मुंबई, दि. 20 - अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा आपला हात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सैल सोडला आहे. नाना पाटेकर आणि आमिर खान यांच्यानंतर आता अक्षयने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत दिली आहे. ही मदत महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवाय अभियानासाठी दिली जाणार आहे. शेततळी तयार करण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. याआधीही, अक्षयने दुष्काळग्रस्तांना थेट मदत दिली होती.