निर्यातीत 16 महिन्यांचा नीचांक 5.5% घसरण
नवी दिल्ली, दि. 19 - अभियांत्रिकी आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत घसरण झाल्यामुळे पुन्हा एकदा मार्च महिन्यात निर्यातीला नुकसान झाले आहे. या महिन्यातील निर्यात 5.5 टक्क्यांनी घसरून 22.7 अब्ज डॉलरवर आली आहे. हा निर्यातीचा सोळा महिन्यांतील नीचांक आहे.
परंतु, या काळात आयातदेखील 21.6 टक्क्यांनी कमी होऊन 27.8 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. सोन्याची आयात 80.5 टक्क्यांनी घसरुन 97.28 कोटी डॉलरवर पोचली आहे. त्यामुळे व्यापार तूटही कमी होऊन 11.4 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. मार्चमध्ये पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 21.4 टक्क्यांनी कमी होऊन 2.1 अब्ज झाली आहे तर अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात 11.3 टक्क्यांनी कमी होऊन 5.3 अब्ज डॉलर झाली आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांप्रमाणेच भारताच्या निर्यातीतदेखील घट झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात निर्यातीत 15.9 टक्क्यांनी घसरण झाली आहे. एप्रिल ते मार्चदरम्यान 261.1 अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. त्यापुर्वीच्या आर्थिक वर्षात 310.3 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. दरम्यान, आयातदेखील 15.3 टक्क्यांनी घसरुन 379.6 अब्ज डॉलरवर पोचली आहे. त्यामुळे 118.5 अब्ज डॉलरची व्यापारी तूट निर्माण झाली आहे.