Breaking News

बीड, जालना जिल्ह्यांत दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

बीड, 22 - जालना - बीड, जालना जिल्ह्यांत दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या करून जीवन संपविले. बीडमधील सोमेश्‍वरनगरात बुधवारी (ता. 17) विष घेतलेल्या शेतकर्‍याचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी (ता.18) सकाळी मृत्यू झाला. 
शेख तौफिक बाबामियाँ (वय 55) असे त्यांचे नाव आहे. नाथापूर (ता. बीड) येथील शेख तौफिक बाबामियाँ यांच्याकडे जिल्हा बँकेचे कर्ज होते. नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. त्यातून त्यांनी शहरातील सोमेश्‍वरनगर परिसरात विष प्राशन केले होते. आष्टी (ता. परतूर) येथील शेतकर्‍याने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना आज उघडकीस आली. 
शेतकरी किसन दामोदर गांजाळे (वय 52) हे बुधवारी (ता. 17) दुपारी चारच्या सुमारास शेतात गेले. मात्र ते परतले नाहीत. कुटुंबीयांनी शेतात शोध घेतला असताही ते सापडले नाहीत. आज सकाळी शेतातील त्यांच्याच विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला.खासदार जाधव यांनी व्यापार्‍यांची बाजू मांडताना महापालिका प्रशासन, शासनकर्त्यांनी व्यापार्‍यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत. व्यापार्‍यांना वेठीस धरू नये, अशी भूमिका मांडली. राज्यात कोणत्याच महापालिकेत एजन्सी नसताना परभणी महपालिकेत का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. आयुक्त श्री. रेखावार यांनी प्रशासकीय बाजू मांडताना नियमानुसारच एजन्सी काम करीत असल्याचे सांगितले.