सोमवती पर्वणीला कोरठण खंडोबा दर्शनासाठी भाविकांची गर्दी
अहमदनगर । प्रतिनिधी । 10 - सहा महिन्यातून एकदा येणार्या सोमवती अमवस्या पर्वणी उत्सवात राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असेलेल्या नगर जिल्हातील पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाचे देवदर्शन घेऊन कुलधर्म व कुलाचार भाविकांनी केला
पहाटे क्रांती शुगर व पावर लि पारनेर चे संचालक पांडुरंग नवले व कैलास नवले याचा हस्ते सोमवती पर्वणी निम्मित अभिषेक पूजा करण्यात आली तर आरती विक्रम व नंदा ढोमे या दापात्याच्या हस्ते करण्यात आली यावेळी मच्छीद्र जाधव, दिलीप लाखे, देवस्थानाचे अध्यक्ष पाडुरंग गायकवाड, रामदास मुळ, शाताराम खोसे आदिसह शेकडो भक्त उपस्थित होते. सकाळ पासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या सकाळी दहा वा खंडोबा उत्सव मूर्तीची पालखीतून मंदिरातून टाक्याचा दरां येथे गंगास्नान साठी पालखी सोहळा, छबिना मिरवणूक मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशाच्या गजरात व लेझीम च्या डावात सदा आनंदाचा येळकोट , जय मल्हार च्या जयघोषाने परिसर दुमदुमला .लंगर तोडल्यावर भाविकांनी पालखीवर भंडारा खोबर्याची उधळण केली यावेळी पालखी छबिना पुढे भाविकांनी ओलांडा घेतला व पालखी खालून प्रदक्षणा घातल होते . दुपारी 12 च्या दरम्यान पालखी मिरवणूक हजारो भाविका सह टाक्याचा दरांयेथे आल्यावर उत्सव मूर्तीचे पंचामृताने ब्रम्ह वृंदाच्या मंत्र घोषात पूजन करण्यात आले तर येथील कधीही न आटनार्या विहिरीच्या पाण्याने गंगास्नान घालण्यात आले त्याच वेळी भाविकांनी आपल्या घरातील टाक स्वरूपातील देवांना हि गंगास्नान घातले व देवाची भेट घडवली कोरठण खंडोबाच्या नावानं चांगभलं’ या जय घोषाने दरी दुमदुमून गेली.