भारत खूप सहनशील देश : कतरिना कैफ
मुंबई, 08 - भारतातील असहिष्णुतेवरुन विधान करणार्या आमिर खान, शाहरुख खान या कलाकारांच्या यादीत आता कतरिना कैफच्याही नावाचा समावेश झाला आहे. कतरिनाच्या मते भारत हा एक खूप सहनशील आणि खास देश आहे. आपल्या ’फितूर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना दिल्लीत आली होती. असहिष्णुतेच्या वादाची मला कल्पना आहे. पण, मला वाटते की भारत एक खूप सहनशील आणि खास देश असल्याचे कतरिना म्हणाली.
भारतातील असहिष्णुतबद्दल बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते शाहरुख व आमीर खान यांनी वक्तव्ये केली होती. त्यांना अनुपम खेर व मधुर भांडारकर या बॉलिवूड मंडळींनी विरोध दर्शविला होता. आता कतरिना कैफने भारत हा सहिष्णू देश असल्याचे म्हटले आहे. कतरिना म्हणाली की, भारतात असहिष्णुता असल्याच्या चर्चेबाबत मला फारशी माहिती नाही. मात्र, भारत हा हा प्रचंड सहिष्णू देश आहे. भारतासाठी माझ्या मनात विशेष स्थान आहे. जेव्हा मी भारतात आले, तेव्हा मला घरीच आल्यासारखे वाटले.