Breaking News

राजस्थान औषधालयाकडून लाखो नागरिक व्यसनमुक्त ः चोपदार

नाशिक/प्रतिनिधी। 10 - मनात दृढसंकल्प केल्यास समाजाला व्यसनमुक्त करता येऊ शकते. त्यासाठी सामुदायिक प्रयत्न करायला हवेत. आमच्या संस्थेने गेल्या साठ वर्षांत अशा प्रकारे व्यसनमुक्ती अभियान राबवत बारा लाख व्यसनाधीन नागरिकांना मुक्त केल्याचे राजस्थान औषधालयाचे संचालक एस. डी. चोपदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राजस्थान औषधालयातर्फे शहरातील डॉक्टरांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. चोपदार म्हणाले, की राजस्थान औषधालयाच्या माध्यमातून आम्ही नशा छोडो जीवन मोडो’ अभियानाची सुरवात करत देशातील विविध राज्यांत जाऊन व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करत आहोत. सर्व प्रकारच्या व्यसनाचा विशेषतः मद्याचा एनडीपीएस कायद्यात समावेश करण्यात येऊन त्या पद्धतीने कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी शासनाकडे केल्याचेही सांगण्यात आले. या वेळी डॉ. संजीव सावंत, डॉ. डी. आर. जोशी, अविनाश खन्ना, डॉ. अभय कुलकर्णी व विवेक धनगर आदी उपस्थित होते.