लोककलावंतांचा मोर्चा धडकला...
बुलडाणा (प्रतिनिधी)। 16 - लोककलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात यावी तसेच दिले जाणारे मानधन वेळेवर देण्यात यावे आदी मागण्यांसाठी लोककलावंत सांस्कृतीक मंच बुलडाणाच्या वतीने आज 16 फेब्रु.रोजी लोककलावंतांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकार्यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, लोककलावंताना दरमहा मानधन देण्यात यावे, मानधनात वाढ करुन ते किमान पाच हजार रुपये दरमहा देण्यात यावे, शाहीर लोककलावंतास शासकीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात यावे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात यावी, मानधनासाठी उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात यावी, जिल्हा मानधन निवड समितीची पुर्नरचना करण्यात येवून जुन्य सदस्या एैवजी त्याव त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना समितीवर घेण्यात यावे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शाहीर लोक कलावंतांची परिचय पुस्तीका प्रकाशित करावी, शासकीय योजनांचा प्रचार करणार्या पथकास किमान सहा कलावंताच्या संचास मान्यता द्यावी व त्यांना प्रति कार्यक्रम रुपये 5000 मानधन निश्चीत करावे, शासनाचा 7 फेब्रुवारी 2014 चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा. आदी मागण्या करण्यात आल्या.
या मोर्चात शाहीर डि.आर.इंगळे, शाहीर निवृत्ती घोंगटे, विष्णु शिंदे, प्रेमसागर कांबळे, धोंडू खराटे, भिमराव थोरवे यांच्यासह लोककलावंतांची उपस्थिती होती.