मानवअधिकार आयोगाच्या विदर्भ अध्यक्षपदी विनोद माळी
बुलडाणा (प्रतिनिधी)। 21 - राष्ट्रीय मानवअधिकार व सामाजिक न्याय आयोगाच्या विदर्भ अध्यक्षपदी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व जनमाणसांत सामाजिक प्रतिष्ठा असणारे बुलडाणा येथील विनोद माळी यांची निवड नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.महताब रॉय यांनी एका नियुक्ती आदेशाद्वारे निवड केली आहे.
या आदेशानुसार सामाजिक, राजकीय व खाजगी संस्था, शाळा महाविद्यालये, खाजगी कंपन्या व खासकरुन सर्वसामान्य महिलांचे होणारे आर्थिक व मानसिक शोषण तसेच त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी विनोद माळी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ.महताब रॉय यांनी सांगितले आहे. विनोद माळी यांच्या नियुक्तीचे सर्वत्रकौतूक होत असून जनमाणसांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
त्यांच्या या निवडी बद्दल जिल्हाध्यक्ष दानिश शेख, निलेश मोहब्बे, आनंद जाधव, अनिता चौधरी, प्रभाकर वरपे, दिनेश महाजन, आर.डी.आराख, आशा सोनुने, प्रमोद माळी, बबन खेडकर, शाकीर रजा, अरुण माळी, वज्रग्रुप बुलडाणाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.