Breaking News

सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत 6 नक्षलवादी ठार

हैदराबाद, 01 - सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. मृत नक्षलवाद्यांमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. 
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती. आंध्र प्रदेशचे ग्रेहाउंड्स आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या शोधमोहिम सुरु केली. नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सुरक्षा रक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन महिलांसह सहा नक्षलवादी ठार झाले आहेत.