Breaking News

शाहरुखने 28 वर्षांनंतर घेतली कॉलेजमधून डिग्री

नवी दिल्ली, 17 - बॉलिवूडचा किंगखान शाहरुख मंगळवारी दिल्लीत हंसराज कॉलेजमध्ये पोहोचला. निमित्त होते डिग्रीचे. शाहरुख तब्बल 28 वर्षांनंतर डिग्री घेण्यासाठी कॉलेजात पोहोचला. परिणामी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या विरोधात ’शाहरुख गो बॅक’ अशी घोषणाबाजी केली. या गोंधळात शाहरुखचा आगामी सिनेमा ’फॅन’चे गीतही रिलीज झाले. 
शाहरुखने हंसराज कॉलेजमधून 28 वर्षांनंतर बीएची डिग्री घेतली. यादरम्यान त्याने त्याच्या कॉलेजच्या दिवसांतील आठवणी सांगितल्या. शाहरुख कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी त्याच्या विरोधात मोर्चा काढला. हे विद्यार्थी भाजपच्या विद्यार्थीदल एबीव्हीपीचे होते.  दिल्ली पोलिसांनी नारे लावणा-या विद्यार्थांमधील चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांसोबत यांची हाथापाईसुध्दा झाली. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.  शाहरुखने कॉलेजमध्ये सांगितले, की ’हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे. मी 1988नंतर कॉलेजला आलो आहे. आज मला एकाच गोष्टीची  कमतरता भासत आहे, ती म्हणजे माझी मुले माझ्यासोबत नाहीत. त्यांना मला कॉलेज दाखवायचे होते. शाहरुख येथून इकॉनॉमिक्समध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले होते, परंतु डिग्री घेतली नव्हती.