Breaking News

सेंट झेविअर्स शाळेसमोर गतिरोधक बसवा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा रास्ता रोको

 नाशिक/प्रतिनिधी। 21 - आज सेंट झेविअर्स शाळा जवळजवळ संपूर्ण जगात प्रचलित आहे. नाशिकमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या या शाळेने नाशिक शहरास अनेक हुशार व गुणवंत असे विद्यार्थी दिलेले आहे. महामार्गावरून जोरात येणारे वाहनचालक व ट्रक चालक यांच्यामुळे येथे दुर्घटना होण्याची शक्यता वाढली आहे. याबद्दलचे निवेदन नाशिकरोड अध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी जिल्हाधिकार्यांना यापूर्वी दिले होते पण अजून हि येथे कुठल्याही प्रकारचे गतिरोधक, फलक व वाहतूक  पोलीस कर्मचारी अशी विविध प्रकारची मागणी अद्यापही पूर्ण करण्यात  आलेले नाही.
सकाळी शाळा भरण्याची वेळ व करन्सीनोट प्रेस भरण्याची वेळ सारखीच असल्याकारणाने येथे विद्यार्थ्यांचा किरकोळ अपघात हे रोजच होत असतात. म्हणून पालक येथे वाहतूक नियंत्रक करीत असल्याने वाहनधारक व पालक यांच्यात रोज बाचाबाची व भांडणे हे होत असतात. त्यामुळे येथे एक वाहतूक पोलीस कर्मचारी शाळा भरते वेळी व सुटण्याच्या वेळी असणे गरजेचे आहे. सकाळच्या वेळी ट्रक व कँपनीच्या बस ह्या भरधाव वेगाने येथून जातात  व शाळेची वेळ हि सकाळचीच आहे. 
शाळेजवळ वेग मर्यादा व पुढे शाळा आहे असे फलक असले पाहिजेल पण येथे असे कोणतेही फलक नाही. अशा विविध मागण्याचे निवेदन यापूर्वी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते व त्यांनी या बाबत आश्‍वासनहि दिले होते पण यातील कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा एकदा हे निवेदन उपनगर पोलीस निरीषक यांना देण्यात आले आहे. व  चालू असलेल्या रस्ता सुरक्षा साप्ताह मध्ये गतिरोधक बसविले नाही तर रस्ता रोको  करण्याचा इशारा यावेळी नाशिकरोड अध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी दिला आहे. याप्रसंगी मुकेश शेवाळे, अमोल लोखंडे, सुहास हांडोरे, प्रमोद खोलमकर, अमोल धावणे, किरण पगारे, ऋषिकेश कोठुळे, प्रशांत खैरनार, निखील खैरनार, संदेश बच्छाव, इम्रान अन्सारी, शुभम चांदण, प्रसाद डोंगरे, स्वप्नील सोनवणे, सचिन जगताप, कन्हैय्या पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते 
मोठ्या संख्येने उपस्थित होते.