Breaking News

शिवकार्य गडकोट मोहिमेचे किल्ले कावनईवर भर उन्हात श्रमदान


 नाशिक/प्रतिनिधी। 21 -  कावनई हे तीर्थक्षेत्र आहे ऐतिहाशिक पौराणिक वारसा असलेला किल्ले कावनई किल्ल्यावर शिवकार्य गडकोट मोहिमेची 31 वी दुर्गसंवर्धन श्रमदान मोहीम नुकतीच झाली. यावेळी कावनई किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या गाळाने, माती, दगडाने गच्च भरलेल्या जलश्रोताचे श्रमदानातून भर उन्हात गाळ, चिखल, दगडे काढण्यात आला. किल्ल्यावरील प्लास्टिक कचरा वेचून पोत्यात भरण्यात आला. किल्ल्यावरील ऐतिहाषिक राजवाड्याची, किल्लेदाराच्या, भग्न वाड्याचे नावालाच उरलेले अवशेष, जलाशये गवतात लुप्त आहे. केवळ गड किल्ल्याचे भुयारी मार्ग बुजलेल्या अवस्थेत आहे ,हे बघून  तीर्थाच्या, परिसराच्या विकासासाठी आलेल्या कुंभमेळा (2015/16) कोट्यवधीच्या कुंभमेळा निधीतून कावनई किल्ल्याच्या संवर्धनासाठी,विकासासाठी कुठलेही कामकाज झाल्याचे कुठेहि दिसत नसल्याने उपस्थित दुर्गसंवर्धकानी किल्यावर बैठक घेवून तीव्र संताप व्यक्त केला.
नाशिक जिल्ह्याच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन कार्यात गेल्या चार वर्षापासून अखंड श्रमदान करणार्‍या शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने किल्ले कावनई श्रमदान दुर्गसंवर्धन मोहीम झाली. नाशिकपासून अवघ्या 45 किलोमीटर वर असलेल्या किल्ले कावनई इगतपुरी तालुक्यात आहे पवित्र कपिलधारा तीर्थाच्या पूर्वेस किल्ले कावनई आहे, सह्याद्रीच्या उपरांगेत असलेल्या या किल्यावरुन दूरवरचे हरिहर,त्र्यंबकगड (दुर्गभांडार), भास्करगड, अलंग-मदन, मोरधन,अंजनेरीच्या पूर्वेस असलेल्या सुळका व घरगड या किल्ल्यांचे दर्शन होते ,वैतरणा, मुकणे दारणा धरणांचे मनोहारी दर्शन होते. कावनई कपिलधारा तीर्थ याठिकाणी कपिलमुनी यांच तपोभूमी आहे.  याठिकाणी याठिकाणी पेशव्यांनी दिलेला ताम्रपट, सनदा, हुकुमनामे, भेटवस्तू आजही जपून ठेवलेल्या आहेत .या कापिलधारेच्या पश्‍चिमेला असलेल्या कावनई किल्ल्यावर पायथ्याशी असलेल्या गावातून जावे लागते,किल्ल्यावरती चढताना किल्ल्याच्या तटबंदीचे दर्शन होते ,तग धरून राहिलेला दगडी दरवाजा दिसतो ,आणि त्यापर्यंत चढण्यास लोखंडी सीडी आहे.तेथून किल्ल्याच्या माथ्यावर जाताच देवीचे मंदिर दिसते त्यासमोर असलेले तळे दिसते ,त्यासमोर महादेवाचे लिंग आहे.
तसेच याठिकाणी त्याकालीन किल्लेदारांच्या पडलेल्या गवतात लुप्त दक्षिणोत्तर दिसतात,तसेच सैन्याच्या तंबूच्या राहुटयाच्या खुणा दिसतात ,पश्‍चिमेस असलेली 8 फूट रुंदीची दगडी तग धरून असलेली तटबंदी दिसते ,किल्ल्यावर 5 ते 6 प्राचीन जलाशये आहेत ,म्हणून किल्ले कावनई इतिहासप्रेमी भाविक भक्तांचे तीर्थक्षेत्र आहे . शिवकार्य गडकोट मोहिमेच्या किल्ले कावनई श्रमदान मोहिमेत संस्थापक राम खुर्दळ, मुख्य संयोजक योगेश कापसे, दुर्गजागृती सांस्कृतिक विभाग प्रमुख संकेत नेवकर, शिस्तपालन समितीचे प्रमुख पवन माळवे, प्रीतम भामरे,प्रसिद्धी विभागाचे निलेश ठुबे, दुर्ग पोस्टर विभाग प्रमुख पक्षिमित्र भीमराव राजोळे, पद्माकर इंगळे, पद्माकर इंगळे, हरी पवार, अश्‍विनी कापसे, संतोष गुप्ता, मनोज कांबळे,विष्णू खैरनार, नंदकुमार कापसे यासह बाल दुर्गसंवर्धक सलीम सय्यद कावनई गावातील प्रसाद पाटील, जीवन पाटील ही मुले श्रमदानात सहभागी झाले होते.