Breaking News

अपघातावर मात करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा - सहा. पोलीस निरीक्षक के.टी. रंजवे

 नाशिक/प्रतिनिधी। 21 -  वाहन धारकांनी रस्त्यावर वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम व आर टी ओ कार्यालयाचे नियम पाळले तर बहुतांशी अपघातांवर नियंत्रण ठेवता येईल. यातून हजारो लोकांचे जीवन सुरक्षित होऊ शकते. वाहतुकीचे नियम न पाळल्यानेच मोठ्या स्वरूपाचे अपघात घडत आहे असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक के, टी रंजवे यांनी केले.
 दिंडोरी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रादेशिक परिवहन विभाग , दिंडोरी पोलीस ठाणे, साईराम मोटार  ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला, या यावेळी व्यासपीठावर  सहाय्यक पोलीस निरीक्षक के टी  रंजवे ,साईराम मोटार  ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक किशोर देशमुख , वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.धीरज झाल्टे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.नाना चव्हाण, पोलीस हवालदार आर.एल.काकड, बी.एन.कावळे, विद्यापीठ प्रतिनिधी माणिक वाघेरे उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजवे म्हणाले की विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे.  मद्यप्राशन करून गाडी चालविणे, वाहन परवाना जवळ बाळगून गाडी चालविणे, वाहनाचे कागदपत्र वाहनांसोबत ठेवणे, आदि बाबींवर काटेकोर लक्ष ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. गाडी पार्किँग करतांना योग्य ती काळजी घ्यावी असे सांगितले, प्रास्ताविक सादर करतांना प्रा.धीरज झाल्टे म्हणाले की वाहतुकीचे नियम पाळले तर दरवर्षी सुमारे 3 ते 4 लाख अपघातात मृत्यू पावतात त्यावर नियंत्रण ठेवता येईल. स्वतःच्या व रस्त्यावर चालणार्‍या इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. सूत्रसंचालन आरती क्षीरसागर यांनी केले तर आभार हेमंत जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्या डॉ.पोर्णिमा बोडके व उपप्राचार्य डॉ.उगले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.धीरज झाल्टे, प्रा.तुषार उफाडे, प्रा.अभय सिणारे, प्रा.अरविंद केदारे, प्रा.नाना चव्हाण, प्रा.शिवाजी साबळे, यांनी नियोजन केले.