Breaking News

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोकण किनारपट्टीवरही हायअलर्ट


मुंबई, 10 - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणी अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीही सतर्क झाली आहे. कोकण किनारपट्टीवर सुरक्षा वाढविण्यात आली असून देवगड बंदरामध्ये नौदलाची के.44 ही युद्धनौका दाखल झाली आहे.
दहशदवादी सागरी मार्गाने शहरात घुसू शकता. हे मुंबईवरील हल्ल्यानंतर स्पष्ट झाले होते. त्यामुळे किनारपट्टीवर हाय अ‍ॅलर्टचे आदेश जारी करण्यात आले आहेत.