Breaking News

वाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल व साहित्य वाटप

 अहमदनगर । प्रतिनिधी । 21 - सगळीकडे आधुनिकीकरण होत असताना आपली संस्कृती लोप पावणार नाही ना अशी भीती वाटत आहे. इतरांना मदत करणे ही आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचे जतन प्रत्येकाने आपापल्या परीने करायला हवे. सामाजिक भावनेने समाजासाठी काम करावे. गरजवंतांची गरज करणारे समाजामध्ये खूप थोडे लोक आहेत. कुमारसिंह वाकळे यांनी आज अपंगांना केलेली मदत ही अपंगांना स्वावलंबी बनविण्यासाठी उपयोगी ठरेल. इतरांनी यापासून प्रेरणा घेऊन अपंगांसाठी कार्य करावे. धार्मिकतेमुळे तरुण पिढीवर चांगले संस्कार होतील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
मनपा सभागृहनेते कुमारसिंह वाकळे यांच्या वतीने अपंगांना तीनचाकी सायकल व साहित्याचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विपूल शेटिया, सागर बोरुडे, सचिन जगताप, तुकाराम कातोरे, अण्णा इथापे, दादा आडसूळ, गहिनीनाथ बडे, श्रीराम यादव, सुमन भिंगारदिवे, भालेराव, सुधाकर गव्हाणे, सुभाष कातोरे, गायकवाड, यमुना बडे, सुनीता पडोळे, साधना बोरुडे, वनिता पालवे, रमेश वाकळे, योगेश पडोळे, राजेंद्र खेडकर, सतीश पडोळे, अविनाश काळे, महादेव लाड आदी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले की, कुमारसिंह वाकळे यांनी सामाजिक बांधिलकीबरोबरच प्रभागातील विकासकामे मार्गी लावली असून, विकासकामांसाठी त्यांचा नेहमीच पाठपुरावा असतो. चैतन्य हॉटेल ते गांधीनगरपर्यंतच्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. हे काम सुमारे 1.5 रुपयांचे असेल, असे ते म्हणाले. वाकळे म्हणाले की, सामाजिक भावनेतून आपण अंपंगांना सायकल व साहित्याचे वाटप केले आहे. समाजहितासाठी यामागील काळात काम केले आहे व करीत राहीन. आ. जगताप यांनी बोल्हेगाव, नागापूर परिसरासाठी सुमारे 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने या परिसराचा कायापालट होत आहे, असे ते म्हणाले.