Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दारुबंदी आंदोलन

 अहमदनगर । प्रतिनिधी । 21 - सरकारकडून दारुला प्रोत्साहन दिले जात असल्याच्या निषेधार्थ नगर जिल्हा दारुबंदी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या संयुक्त बैठक घेण्याच्या आश्‍वासानानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
जिल्हा दारुमुक्त करावा, या मागणीसाठी जिल्हा दारुबंदी आंदोलनच्या अध्यक्षा अँड. रंजना गवांदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सरकारच्या धोरणाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कवडे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान गवांदे यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. सरकारकडून दारुला बढावा दिला जात आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असून, सरकारची ही भूमिका अयोग्य आहे. त्याविरोधात आंदोलन करण्यात येत असून, भविष्यात मोठे आंदोलन उभे करणार काय आहेत मागण्या : जिल्ह्यात तत्काळ दारुबंदी घोषित करा
दारुमुक्तीसाठी प्रबोधनाचा कार्यक्रम राबवा,दारुबंदी चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे.
सहमतीने दारुबंदी शक्य जिल्ह्यातील दुकाने बंद करून दारुबंदी करणे शक्य नाही. त्यासाठी शासनाचे काही नियम आहेत, त्याची पूर्तता करावी लागेल आणि त्यासाठी सर्वांची सहमती आवश्यक आहे. सर्वांची सहमती असेल तरच दारुबंदी करणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी यावेळी सांगितले.
अवैध दारुचा जिल्ह्यात सुळसुळाट जिल्ह्यात दारुबंदी करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे पेव फुटले आहे. गावागावात बेकायदेशीररित्या दारुची विक्री करण्यात येत असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नाही, अशी तक्रार अँड. गवांदे यांनी यावेळी केली.