हैदराबादमध्ये बीफ खायचे असेल तर एमआयएमला मत द्या: ओवेसी
नवी दिल्ली, दि.26 - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी यांनी बीफ प्रकरणाला हात घातला आहे. याचप्रकरणी हैदराबादमध्ये एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी एक वादग्रस्त विधान केले आहे.
मागील आठवड्यात हैदराबादमधील एका निवडूणक प्रचाराच्या रॅलीमध्ये ओवेसी म्हणाले की, ‘जर तुम्हाला हैदराबादमध्ये बीफ खायचे असेल तर आमच्याच पार्टीला मत द्या’ ओवेसींनी आपल्या भाषणात मुंबईचे उदाहरण दिले. ओवेसी म्हणाले की, ‘जर एमआयएम स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत हरल्यास अल्पसंख्यांकांनी बीफ खाणे विसरुन जावे, त्यानंतर ओवेसींनी आपल्या भाषणात महाराष्ट्राचाही उल्लेख केला. महाराष्ट्र सरकारने बीफ बॅन करुन दलित आणि मुस्लिमांना टार्गेट करण्यात आले आहे. या भाषणाची
सुरुवात ओवेसींनी पंतप्रधान मोदींची नक्कल करीत केली होती.