Breaking News

आधी बिहार-दिल्ली आठवा! मग मुंंबईची स्वप्न पाहा

मुंबई, प्रतिनिधी, दि. 25 - आता हळद लागलेल्या अनेकांना मुंबई महानगरपालिका जिंकण्याची स्वप्न पडत आहेत. दिल्लीत आणि बिहारमध्ये यांना स्वप्न पडली होती त्याचं काय झालं? असा जोरदार टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाणला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित क
रण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
झेंडा नीट फडकतो की नाही ते तरी पाहा, इथं जास्त फडफड करण्याची गरज नाही. मुंबई महापालिकाच नव्हे तर विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. अगदी वर्षभरातच मुंबई महापालिकांच्या निवडणुका होणार असून भाजप आणि शिवसेनेमध्ये त्यावरुन आताच शाब्दिक चकमकी उडू लागल्या आहेत. राज्यात भाजप-सेनेचं सरकार असलं तरीही दोन्ही पक्षांमध्ये सुरुवातीपासूनच कुरुबुरी सुरु आहेत. त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोघांकडून दवडली जात नाही. त्यातच काल बाळासाहेबांच्या जयंतीचं निमित्त साधत परिवहन खात्याने 8 नव्या योजनांचा शुभारंभ केला. या आठही योजनांमधील हिंदूहृदयसम्राट शब्दावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. त्यांचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला.मी कोणत्याही हत्येचं समर्थन करत नाही. मी दादरी प्रकरणाचेही समर्थन करत नाही. आजकाल जरा आपण हिंदू धर्माची बाजू घेतली की आपण असहिष्णू होतो. असं म्हणत असहिष्णूतेच्या मुद्दयावरही उद्धव यांनी भाष्य केलं.तसंच भारत-पाक चर्चेवरही उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं. चर्चा करुन काय मिळणार, पठाणकोटचा हल्ला झाला, आपण केवळ पुरावे देऊन गप्प 
बसलो. पठाणकोटचा बदला काय चर्चा करुन घेणार आहात का? असा सवालही उद्धव यांनी विचारला.