Breaking News

कनेरियाचा ’बीबीसीआय’कडे मदत मागितल्याच्या वृत्ताला नकार


नवी दिल्ली, 22 - पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने आपण ’बीबीसीआय’कडे मदत मागितल्याच्या वृत्ताला नकार दिला. दानिशवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानं आजन्म बंदी घालण्यात आली.
’मिड डे’ या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, दानिशने आपले आयुष्य सावरण्यासाठी बीसीसीआयसमोर आपले हात पसरवले होते. बीसीसीआयकडे अपिल करत दानिशने ’भारतीय बोर्डाने मला स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपले म्हणणे आयसीसीसमोर ठेवण्याची संधी द्यावी’ अशी मागणी केली होती. इतकेच नाही तर आपले आयुष्य आणि क्रिकेट वाचवण्यासाठी बीसीसीआय आपली मदत करू शकते, असाही त्याला विश्‍वास आहे.