Breaking News

आयसिसच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून ठाण्यातून 1, कर्नाटकातून 2 अटकेत


ठाणे, 22 -आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून  राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएसने  मुंबईजवळच्या ठाण्यातून एक संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. 
याशिवाय तिकडे कर्नाटकातूनही दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. कर्नाटकातील मंगळुरू आणि टुमकूरमधून या दोघांना अटक करण्यात आले आहे. हे सर्व आयसिसच्या संपर्कात असल्याचा संशय आहे.  नजमुल हुडा या केमीकल इंजिनिअरला मंगळुरूमधून तर सय्यद हुसैनला टुमकूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, ठाण्यात अटक करण्यात आलेला तरूण हा ठाण्याजवळच्या मुंब्रा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणमधील काही तरुण आयसिसच्या संपर्कात होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा तसेच अन्य आयसिस दहशतवाद्याशी संपर्क साधल्याचा आरोप, आज अटक क
रण्यात आलेल्या तरुणावर आहे.