Breaking News

‘पीएनजी ज्वेलर्स’चे सिल्व्हर स्टोअर नव्या विस्तारित स्वरुपात


पुणे (प्रतिनिधी), 13 - भारतातील सर्वाधिक अनुभवी ज्वेलरी ब्रँडपैकी असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ने पुण्यातील लक्ष्मी रोड येथील आपले चांदीचे दालन नव्या विस्तारित स्वरुपात सादर केले आहे. या नूतनीकरण केलेल्या स्टोअरचे उद्घाटन ‘स्टेट बँक ऑफ इंडिया, पुणे’चे सरव्यवस्थापक पार्थ प्रतिम सेनगुप्ता यांच्या हस्ते आज झाले. ‘पीएनजी ज्वेलर्स’ने आपल्या प्रिय आणि निष्ठावंत ग्राहकांसाठी हे आघाडीचे सिल्व्हर डिझायनर ज्वेलरी दालन विविधता व अभिनवतेने समृद्ध बनवले आहे. 
‘पीएनजी ज्वेलर्स’चे चांदीच्या अलंकारांचे हे दालन नेहमीच महत्त्वपूर्ण ठरल्याने त्यांनी त्याचे स्वरुप अधिक प्रशस्त, चैतन्यपूर्ण व ग्राहकांशी मैत्रीपूर्ण बनवले आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’ने प्रत्येक कृतीत स्वतःचा असा ठसा उमटवण्यावर भर दिला असून या संपूर्ण नूतनीकरण केलेल्या दालनात ट्रेडमार्क सहज दिसेल याकडे लक्ष पुरवले आहे. दालनाचे रुप पालटण्याबरोबरच तेथील डिझायनर ज्वेलरी श्रेणीही आधुनिक, मनमोहक व खास बनवण्यात आली आहे. या 1800 चौरस फूट क्षेत्राच्या दोन मजली दालनात अलंकारांच्या उठावदार व अभिनव अशा रचना सादर करण्यात आल्या आहेत, ज्यात डिझायनर ज्वेलरीप्रमाणेच कस्टमाइज्ड ज्वेलरी, अँटिक अलंकार, पूजेची उपकरणे, विशेष हस्तकारागिरीचे चांदीच्या वस्तू, चांदीचे डिनर सेट, कंपन्यांत दिल्या जाणार्‍या भेटवस्तूंचे खास पर्याय आदींचा समावेश आहे.
 पुणे शहर हे ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या प्रगतीचा नेहमीच अविभाज्य भाग राहिले असल्याने पुणेकरांना खास व अभिनव सिल्व्हर डिझायनर ज्वेलरी मिळवून देण्याचा उद्देश आहे. नूतनीकरण केलेले दालन ज्या लक्ष्मी रोडवर वसले आहे, तो परिसर पुण्याचे आर्थिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. अशा मध्यवर्ती ठिकाणी सर्वोत्कृष्ट व अनोखे चांदीचे अलंकार सादर करताना ‘पीएनजी ज्वेलर्स’ला सार्थ अभिमान आहे. 
यासंदर्भात ‘पीएनजी ज्वेलर्स’चे संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, की आम्हाला प्रत्येक नवे साहस करताना उत्साह आणि थरार वाटत असतोच, परंतु नव्या वर्षाची सुरवात अशी भव्य करताना अत्यंत आनंदही होत आहे. पुणे शहराबद्दल आम्हाला खास आत्मीयता असून हे सिल्व्हर ज्वेलरी स्टोअर तर खरोखर खास आहे. आम्ही ही जागा अधिक चैतन्यपूर्ण आणि मैत्रीपूर्ण विकसित केली आहे, कारण ग्राहकांचे अगत्य आणि त्यांना सर्वोत्तम सेवा पुरवण्यावर आमचा दृढ विश्‍वास आहे. स्टोअरच्या बाह्यरुपाबरोबरच येथील अलंकारांच्या रचना आणि ग्राहक सेवा अद्ययावत करण्यात आल्या आहेत.