Breaking News

मुलींनो आत्महत्या करु नका, भाऊ तुमच्या पाठिशी : नाना पाटेकर


उस्मानाबाद, 22 - लातुरच्या मोहिनी भिसेची आत्महत्या समाजाला अंतर्मुख करायला लावणारी आहे. महाराष्ट्रातल्या मुलींना कळकळीची विनंती आहे की तुमचा भाऊ आणि पितातुल्य नाना तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही खचून जाऊन टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन अभिनेता नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ या संस्थेकडून करण्यात आले आहे.
हुंड्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्याने लातुर जिल्ह्यातल्या भिसे वाघोली गावच्या मोहिनीने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर ‘नाम’कडून हे आवाहन करण्यात आले. दुष्काळी मराठवाड्यात नाना- मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. ‘नाम’ फाऊंडेशन सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून शेतकर्‍यांच्या मुलींचे लग्न लावून देत आहे.