Breaking News

धोनीसाठी सिडनी वन डे अखेरची ?


सिडनी, 22 - टीम इंडियाच  मालिकेतले अपयश कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीला गालबोट लावणारे ठरू शकते. धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं गमावलेली ही वन डे सामन्यांची सलग तिसरी मालिका ठरली आहे.
2015 सालच्या विश्‍वचषकानंतर भारताने झिम्बाब्वे दौर्‍यातली वन डे सामन्यांची मालिका जिंकली होती. पण त्या वेळी टीम इंडियाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली झिम्बाब्वेचा दौरा केला होता. त्यानंतर बांगलादेश दौर्‍यात आणि मग मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं वन डे सामन्यांची मालिका गमावली होती. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला पराभवाची नामुष्की टाळता आली नाही. त्यामुळे वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या कर्णधारपदाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.