Breaking News

फुल पँट न घालता त्यांनी हाफ पँट घातली : अजित पवार


पुणे, 22 - फुल पॅण्ट न घालता हाफ पॅन्ट घातली. अरे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, यांच्या विषयी न बोललेलेच बरे असे म्हणत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी आमदार आणि भाजपाचे पिंपरी-चिंचवडचे नव निर्वाचित शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना टोला लगावला.
अजित पवार म्हणाले, मी यांना वेळोवेळी पद देऊन मोठे केले,  सत्ता गेली म्हणून माणसाने पक्ष बदलू नये. तशी पद आणि खुर्ची फार काळ टिकत नाही. हे लोक चिक्की घोटाळा करतात, तुरडाळ घोटाळा करतात, यांच्याकडे ख-या शिक्षणाच्या पदव्या नाहीत हे उघड झाले आहे तरी ते मान्य करत नाहीत. खोटे बोल पण रेटून बोल हे यांच्याकडून शिकावे. फडणवीस बारामतीत आले तेंव्हा  आरक्षणाचा मुद्दा पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडवू. आज दीड वर्ष झाली सरकारला मात्र धनगर आरक्षण तर सोडाच पण मुस्लिम आणि मराठा आरक्षणाची पण तिच गत यांनी करून ठेवली. बोगस वकील लावून हे कोर्टमध्ये खटले लढवतात, असा घणाघात अजितदादांनी केला. मावळातील पाणी शहराला मिळू नये म्हणून भाजपाच आडवे येत आहे. या लोकांनी गोळीबाराच्या वेळी मी मावळातला गोळीबार घडवला म्हटले. असे बोलताना लाजा कशा वाटल्या नाहीत, अरे मला पण माणुसकी आहे. आम्हीच त्यांच्या पीडितांना महापालिकेत नोकर्‍या दिल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.