सोनू निगम प्रवाशांना सुखद धक्का
मुंबई, 21 - विमानात आहात आणि अचानक तुमच्या कानावर गायक सोनू निगम गात असल्याचा आवाज पडतो, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? जोधपूर-मुंबई या विमानातून प्रवास करणार्यांनी हा सुखद क्षण प्रत्यक्षात अनुभवला.
प्रवाशांना चक्क कॉकपिट कॉन्सर्ट पाहायला मिळाला.सोनू निगमने विमानातील कानसेनांना आपल्या आवाजाने तृप्त केलं. रेफ्यूजीमधील ‘पंछी नदियाँ पवन के झोकें’सह आणखी काही गाणी प्रवाशांना ऐकवली. सोनू निगम राजस्थानमधील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. हा कार्यक्रम आटोपून सोनू जोधपूर-मुंबई या विमानाने परतत होता.
Post Comment