मोहित कंबोज यांची आयबीजेएच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती
नाशिक/प्रतिनिधी। 30 - मोहित कंबोज यांची इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) कार्यकारी मंडळाच्या मुंबईत झालेल्या सभेत राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली असून ते 2021 पर्यंत पदभार सांभाळतील. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपले कार्यकारी मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर नव्याने जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये सोने व्यापारी हिरे, लॉजिस्टीक, एनबीएफसी, रिटेलर्स, उत्पादक, नॉमिनेटेड एजन्सीज अशा विभागातून 20 संचालक निवडण्यात आले. नुकत्याच मुंबईत बंद दरवाज्याआड झालेल्या सभेत 20 संचालकांनी एकमताने मोहित कंबोज यांनी असोसिएशनच्या अध्यक्षपदी पाच वर्षासाठी म्हणजेच 2016 ते 2021 या कालावधीसाठी नियुक्ती केली.
आयबीजेएचा इंटरनॅशनल बुलियन समिट (आयआयबीएस) हा वार्षिक सोहळा या क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम असतो. नरेंद्र मोदी आणि शक्तीकांत दास हे मोहित कंबोज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आयआयबीएस कार्यक्रमात सहभागी झाले होते.
असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कंबोज यांच्याखेरीज कोणतेही नाव नव्हते. श्री. कंबोज यांच्या नियुक्तीचा निर्णय शंभर टक्के एकमताने घेण्यात आला असून कोणाचेही दुमत नव्हते. 32 वर्षी श्री. कंबोज यांच्या अध्यक्षतेखाली आयबीजेए नवी उंची गाठेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.