Breaking News

पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांना इडीची नोटीस

मुंबई, 30 -  माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ कुटुंबियांसमोरच्या अडचणी वाढतच चालल्यात. हायकोर्टाने नुकतेच तपास यंत्रणांना कारवाईबाबत कडक सूचना केल्यात.
हायकोर्टाच्या सूचनेनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाने छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांना नोटीस बजावली आहे. 800 कोटींच्या गैरव्यवहारांबाबत ही नोटीस आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, नवी मुंबईत खारघरमधील 44 कोटींच्या हेक्जावर्ल्ड गृहप्रकल्पाबाबतची तक्रार तसेच इंडोनेशियास्थित कोळसा प्रकल्पाशी सबंधीत पैशांचा व्यवहार यावर इडीने नोटीस बजावली आहे.