दमबाजी नको, शेतकर्यांना उभे करा - प्रतिक पाटील
सांगली ः दि. 9 - शेतकरी आणि कारखानदारांना वसुलीची भाषा वापरण्यापेक्षा अशा शेतकर्यांना उभा करण्याची भाषा वापरावी असे आवाहन माजी केंद्रीयमंत्री प्रतिक पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील याना केले आहे . खासदार संजयकाका पाटील यांनी म्हैसाळ योजना सुरु करावी ते आयुष्यभर निवडून येतील असा टोलाही प्रतिक पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
यावेळी प्रतिक पाटील म्हणाले कि, मी म्हैसाळ योजना सुरु व्हावी हि माझी प्रामाणिक इच्छा आहे.यासाठी मी केंद्रस्तरावर पाठपुरावा केला. दुष्काळी जनतेसाठी सातत्याने टंचाईमधून या योजनेची वीज बिले भरली मात्र आज शेतकरी अडचणीत असताना सांगलीचे खासदार वीजबिलासाठी वसुलीची भाषा वापरत आहे हि दुर्देवी बाब आहे.त्यामुळे सांगलीच्या खासदारांनी शेतकरी आणि कारखानदारांना वसुलीची भाषा वापरण्यापेक्षा जिल्ह्यातील दुष्काळी शेतकर्याना उभे करण्याची भाषा वापरावी आणि म्हैसाळ योजना लवकर कशी सुरु होईल यासाठी खासदारांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असा टोलाही प्रतिक पाटील यांनी लगावला. दरम्यान, आज म्हैसाळ योजनेतून शेतकर्यांसाठी पाच आवर्तन देण्याबाबत पाटबंधारे विभागाचे काय नियोजन आहे याची
माहिती घेनेसाठी आज म्हैसाळ योजनेच्या अधिकार्यांसमवेत काही शेतकरी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाणी पट्टी भरण्याची समर्थता दिली आहे . त्यामुळे शेतकर्यांची हि योजना सुरु व्हावी अशी प्रामाणिक भूमिका आहे मात्र सरकार याकडे म्हणावे तितक्या काळजीने पहात नसल्याने हि योजना प्रलंबित राहिल्याचेही प्रतिक पाटील यांनी स्पष्ट केले.